10 AUG

कळसुबाई शिखर चढण्याचा एक थरारक अनुभव

ARYA ACHARYA 15 Comments

कळसूबाई ट्रेक जेव्हां कळसूबाई शिखर चढायला सुरुवात केली तेव्हा काहीच वाटले नाही पण जस जसे चढायला लागलो तेव्हा वाटायला लागले,किती चढायचे आहे.एका दुकानासमोर थांबलो तर तिथून माणसं खुप छोटे छोटे दिसत होते.आपल्या हाताच्या करंगळी पेक्षा छोटे...... लोखंडी शिडी पाहून मला खूप भीती वाटली होती.इथून आपण पडणार तर नाही ना..असे वाटायला लागले.माझे पाय खूप दुःखु लागले.कुठे थांबून बसलो की,उठायचं मनच करत नव्हत.उठताना joints दुखत होते.असे करत करत एकदाचे वर पोहचलो.आनंद काका आणि आम्ही सगळ्यांनी संविधान प्रास्ताविक चे वाचन केले.आनंद काकांनी आमच्यासोबत फोटो काढले फार छान वाटले. आता उतरताना आधी पेक्षा खुप भीती वाटायला लागली होती.आता पाय फुटतात की काय असे वाटू लागले होते.मी बसून बसून खाली आले.वरून दिसणारी नदी मला खूप आवडली.आकाश आणि खुप सारे डोंगर खूप आवडले.तिथे मला फोटोग्राफी साठी जायला पुन्हा आवडेल.माझा हा अनुभव मी कधीच विसरणार नाही.

Thank YOu..

आर्या प्रेम आचार्य, अलिबाग

User Comments

360 Explorer

Reply 1 year Ago

Thank you

Leave A Comment