10 AUG

कळसुबाई शिखर चढण्याचा एक थरारक अनुभव

रमेश बनसोडे 15 Comments

कळसुबाई शिखर चढण्याचा एक थरारक अनुभव एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे सर यांच्या सबोत कळसुबाई ट्रॅकिंगचा एक अनुभव.....! कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांची उंची समुद्र सपाटी पासून 1645 फूट इतक्या उंचीवर असलेले हे शिखर सहयाद्री च्या कुशीत वसलेले त्यांच्य सोंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील काण्या कोपऱ्यातुन पर्यटक या ठिकाणी ट्रेकिंगला येत असतात.मी हे अनेकदा वाचले होते. पण कधी जाण्याचा योग आला नाही. संगमनेर हुन सादाहरण 90 किमी अंतरावर असलेले कळसुबाई शिखर बघावे असे अनेकदा वाटत होते. पण एकतर जोडीदार तसे मिळत नव्हते.आणि जोडीदार मिळलेतर वेळ मिळत नव्हता अशी काही माझी परिस्थिती निर्माण झाली होती.हे शिखर पाण्यासाठी गेले पाहिजे हे मनोमनी नेहमी वाटत होते.पण तसा योग काही केल्या येत नव्हता. भंडारदरा मी तीन ते चार वेळा भरपावसात मोटारसायकल वरुन पहिला भंडारदरा हुन कळसुबाई अवघ्या 30 किमी अंतरावर वर आहे. एक वेळा कळसुबाई ला जाण्याचा प्रयत्न केला पण पाऊस जास्त असल्याने वर शखरावर चढाई करू शकलो नाही. यांची खंत मनांत होती.मला कळसुबाई शिखराच्या पायथ्यापासून परतावे लागले.आणि म्हणून मी एक निश्चय केला की एक दिवस या शिखर वर मी चढाई करू माझ्या मनातील इच्छा पूर्ण करेल. या साठी मी अश्या मित्रांच्या शोधत होतो ज्यामुळे मला त्यांच्या सोबतीने कळसुबाई शिखर चढता येईल. एक दिवशी अचानक फेसबुक वर 360 एक्सपोलिरेर एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे सर यांची जाहिरात पहिली 26 जानेवारी 2020 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान प्रस्तावना वाचण्याचा विक्रम करून त्याची नोंद''हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये होणार असून त्या नोंदीचे प्रमाणपत्र या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व साहसवीरांना मिळणार होते असे त्या जाहिरात मध्ये उल्लेख केलाला.ती जाहिरात मी सविस्तर वाचून क्षणा चा ही विलंब न करता मी माझे नाव नोंदणी करू घेतली आणि माझ्या सोबत माझे मित्र तसेच कापड क्षेत्रात कार्यरत असलेले बालाजी लालपोतु यांना देखील या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्ती केले.त्यांनी देखील क्षणाचा विलंब न करता होकार दर्शवला. या मोहिमेला लागणाऱ्या वस्तूची आम्ही तयारी सुरू केली.25 तारखेला मी आनंद सरांना फोन करून कळसुबाई शिखर मोहिमे बद्दल विचारपूस केली आणि संगमनेरला किती वाजता येणार या विषयी माहिती घेतली कारण मी संगमनेर येथून प्रवास सुरू करणार होतो.माझ्या मनात एक वेगळीच कमालीची उसुक्त होती आणि अनेक प्रश्न उपस्थित होत होते जर मला झोप लागली आणि मला जग नाही आली तर, किंवा गाडी निघून गेली तर ,आपल्या जात येणार नाही. या विचाराने मला काही केल्या झोप येत नव्हती. या कुशी हू त्या कुशीवर आणि जरी अचानक एकदी डुलकी लागलीच तर लगेच जग येत होती.अश्या प्रकारे आदल्या दिवशीच्या रात्री मला काही केल्या झोप येत नव्हती. आणि रात्री दोन वाजता आनंद सरांनी फोन केला आणि सांगितले की आम्ही आता लोणी मध्ये पोहचणार आहोत तर तुम्ही तयारी करून संगमनेरच्या बस स्थानकावर या मी लागलीच तयारी सुरू केली आणि बालु शेठ ला देखील उठवले आणि तयारी करून बस स्थानक वर या असे सांगितले मी लवकर लवकर आवरून माझी तयारी केली आणि माझ्या छोट्या बंधूस मला बस स्थानकावर सोडण्यासाठी सांगितले त्याने मला बस स्थानका वर सोडले समोरचं सोलापूर हुन आलेली गाडी उभी होती.आम्ही गाडी जवळ गेलो.आनंद सर गाडी शेजारी उभे होते.ते प्रत्येकाची विचार पूस करत होते.कोणाला चहा प्यायचा का फ्रेश होण्यासाठी जायचे असेल तर जाऊन या असे सर्वांना आनंद सर सांगत होते.मी आनंद सरांना भेटलो माझे नाव सांगितले त्यावेळी आनंद सर आणि माझी गळा भेट झाली आणि त्यावेळेस मला जाणवले की आनंद सर ही व्यक्ती काही तरी वेगळी आहे.या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ची घरांतील सदस्य प्रमाणे काळजी घेणे. हे मला फार आवडले आणि माझी भेट झाल्यावर जी आमची गळा भेट झाली हे देखील मला खूप छान वाटले. काही व्यक्ती स्वभावाने मोठी असतात तर काही आपल्या गुणांनी तर काही आपल्या कर्तृत्ववाने मोठी असतात त्या पैकीच एक आपले आनंद सर होते.गाडी निघण्यासाठी अजून थोडा अवकाश होता तो पर्यंत मी इतर मित्रांशी ओळख करून घेतली. सौरभ जाधव यांच्याशी माझी ओळखआगोदरच झाली होती. कारण नाव नोंदणी च्या वेळेस दोन ते तीन वेळा त्याने मला कॅल केला होता. आणि म्हणू तो लवकरच माझा मित्र झाला. संगमनेर ते कळसुबाई चा प्रवास हा अवघ्या दोन तासाचा होता.गाडीतील सर्व मित्र झोपलेले होते आम्ही तीन चार मित्र काय ते जागी होतो करण आम्ही म्हणजे मी आणि बाळू शेठ,व बीड वरून आलेली आणि संगमनेरला मुक्कामी थांबलेले हे पाच मित्र तसेच औरंगाबाद येथे आलेले राहुल निपणे या सर्वांना साठी कळसुबाई हे ठिकाण नवीन आणि त्या विषयीची जास्त माहिती जाणून घेण्यास इच्छुक होते.पहाटे साडे पाच वाजता आम्ही कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी म्हणजे बारवी गाव जवळ पोहचलो.गाडीतून खाली उतरल्यावर गारवा जाणवायला लागला मी कान टोपी स्वेटर हातातील गोलज आणलेले असल्यामुळे फारशी थंडी जाणवत नव्हती.बारवी गावाच्या पायथ्यापासून शिखराचे टोक दिसत होते.शिखरावर काजवे चमकावे तसा प्रकाश नजरेस पडत होता. आम्ही आनंद सरांना विचारले ते काय आहे हा प्रकाश कसला आहे त्यावर आनंद सरांनी सांगितले की आता काही लोक शिखर चढत आहेत आणि तो उजेड त्यांच्या हातातील टॉर्च आहे.रात्री ट्रेकिंगला जाणं हे तसं पाहिलं तर धोकादायक आहे. पण तरी साहस वीर हे धाडस करतात ती मजा काही औरच असते.आमच्या स्वागता साठी बाळू घाडे आले बाळू घाडे हे आनंद सरांचे फार जुने मित्र आनंद सर ज्या ज्या वेळेस कळसुबाई च्या ट्रेकिंगला जातात त्या त्या वेळेस अगदी हक्काने आणि मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मित्रांची चहापाणी,नसता,राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था हे बाळू घाटे करत असतात.ठरल्या प्रमाणे आमची देखील चहापाणी, नास्ता, तसेच फ्रेश होण्यासाठी ची व्यवस्था त्यांनी चोख करून ठेवली होती.मी तर पहाटे लवकर उठल्या मुळे फ्रेश,आणि अंघोळ करून आलो होतो. पण बाकीच्या इतर जाणं साठी या गोष्टीची आवश्यकता होती.डोंगर दर्यात राहणारी ही माणसं इतकी प्रेमळ आणि साधीभोळी असते हे आपल्याला त्यांच्या सानिध्यात गेल्यावर जाणवते.ही माणसं खूप मायाळू तसेच खुपचं मनमिळावू स्वभावाची असतात. आमचा नास्ता,चहा पाणी अवरलेले होते.आता सकाळचे आठ वाजले होते.सूर्याची किरणे हळूहळू वर येताना दिसत होती.जसं जसं सूर्यप्रकाश वाढत होता तसं तसं कळसुबाई शिखराचे रूप मनोहर दिसतं होतं. आम्ही ग्रुप मध्ये एका मागे एक असे सर्व जण चालू लागलो आमच्या सबोत छोटा अक्षन होता हा अवघ्या सत्तावीस महिन्याच्या होता. त्याच्यात एक छोटी परी पण होती.ती अवघ्या नऊ वर्षांची होती.हे दोघे ट्रेकिंगला आलेल्या सर्वांना साठी प्रेरणा देणारे होते.हे चमूकले न थकता कळसुबाई शिखर सर करत होते.अक्षन हा आनंद सरांचा मुलगा होता. सर्वजण आपल्या परीने शिखर चढण्यात दंग होते या खडतर रास्तावरून आणि बिकट वळणा वर एक एक पाऊल टाकत हळुवार कळसुबाई शिखर चढाई सुरू होती.सकाळच्या या कोवळ्या उन्हात सहयाद्री च्या पर्वत रांगाचा रांग लाल तांबूस,सोनेरी अंगावर शॉल पांघरल्या सारखा दिसत होता. हे दृश्य विलोभनीय होते.आजूबाजूला सहयाद्री च्या उंच उंच पर्वत रंगा आणि गोल गोल दऱ्या हे सर्व पाहून मन प्रसन्न झाले. हा एक वेगळाच अनुभव आला.ट्रॅकिंग म्हणजे काय हे मला ठाऊक नव्हते पण या अगोदर मी शिवनेरी किल्ला,दौलताबाद चा किल्ला, तसेच सप्टेंबर महिन्यात मी वैष्णव देवी ला गेलो होतो.तिथे वर चढणे माझ्या साठी खुपचं चॅलेंजिग होते.त्रिकुट पर्वताची उंची साधहरण समुद्र सपाटी पासून 6616 मी इतकी उंची होती. 14 किमी ट्रॅकिंग करणे हे शक्य नव्हते.जसं जसं मी वर चढत होतो तसं तसं मला दम लागत होता संपूर्ण शरीर दुःखात होते पाय चालू देत नव्हते तरी पण हळूहळू मी ते शक्य केले आणि वैष्णव देवीच्या उंच शिखरवरपोहचलो. वैष्णव देवी चढण्यास मला साधहरण आठ तास लागले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्रेकिंगचा भाग होता.त्यामुळे कळसुबाई शिखर हे माझ्या समोर जास्त मोठे चॅलेंजिग नव्हते.बिकट वळणातून वाट काढत आम्ही दुपारी साडे बारा वाजता शिखरावर पोहचलो शिखरांची उंची समुद्र सपाटी पासून 1646 मी एवढी असून शिखरावर पोहचल्यावर आम्ही आगोदर जेवण करून घेतली कारण सलग चार तास आम्ही चालत होतो.संपूर्ण शरीर थकले होते लिंबूपाणी पिऊन पिऊन मी शिखरं सर केला त्यामुळे खुपचं भूक लागली होती आणि म्हून आगोदर जेवण करून घेऊ या असे आनंद सरांनी सूचना केली आणि सर्वांनी आनंद सरांच्या आदेशानुसार जेवण करून घेतले तो दिवस माझ्या साठी खुपचं महत्वाचा होता कारण महाराष्ट्रच्या कण्याकोपऱ्यातुन जवळपास 65 जाणं या मोहिमेत सहभागी झाले होते. या सर्वांना सोबत शिखरावर वनभोजनाचा आनंद काही औरच होता.नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातुन थोडा तरी वेळ आपण निसर्गाच्या सानिध्यात घातला पाहिजे आपले मन प्रसन्न राहते पण आपण असे कधीच करत नाही. सर्व आटोपल्यावर आम्ही भारतीय संविधानाच्या प्रस्तावणेचे सामूहिक वाचन केले आणि भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली. नुकताच स्थापन झालेल्या राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार सर्व शाळा मध्ये संविधानाच्या प्रस्तावणेचे वाचन झाले पाहिजे या आदेशाचे पालन करून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही मोहीम यशस्वीपने राबविली विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व साहस वीरांचे हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली . हे माझ्या साठी खुपचं मोठी गोष्ट होती.खरं तर मी एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे सरांचा खुप आभारी आहे त्यांनी मला या मोहिमेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर्व कार्यक्रम आटोपल्यावर प्रत्येक जण सेल्फी घेण्यात दंग झाला सादाहरण तासा भरणं आम्ही कळसुभाई शिखर उतरण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा आमचा खडतर प्रवास सुरू झाला होता. शिखर चढतांना जेवढा त्रास झाला होता. त्याही पेक्षा जास्त उतरताना होत होता कारण उतरतांना पायांचे थरकाप जास्त प्रमाणात होतो आणि फार कळीजी पूर्वक एक एक पाऊल जपून टाकावे लागते थोडा जरी आपला बॅलन्स चुकला तरी आपल्याला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुपारी दोन वाजता कळसुबाई शिखर उतरण्यास सुरुवात केली होती. तर आम्ही संध्याकाळी साडे पाच वाजता घाटे यांच्या घरी पोहचलो.हातपाय स्वच्छ पाण्याने धुवून फ्रेश झालो. कारण घुळीने सर्व अंग माखलेले होते. त्यामुळे चेहऱ्यावर थोडे पाणी मारले वर बरें वाटले पण हात पाय खुपचं दुःखात होते. चालता येत नव्हते. थोडा आराम झाला आणि थोडा गरम गरम चहा प्यायला मिळाल्याने थोडे बरें वाटले. आता परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. त्यामुळे आनंद सरांनी जे जाणार होते त्यांना 360 एक्सपोलिरेर चे आणि हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे कन्फर्मेशन लेटर असे दोन प्रमाण पत्रे देण्यास सुरुवात केली आणि पुणे,नासिक अश्या ठिकानाहून आलेल्या साहसविराना प्रमाणापत्रे देण्यात आली. आनंद सरांचा लग्नाचं वाढ दिवस असल्याने सरांनी संगमनेर येथे हॉटेल पंचवटी मध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती आणि बाकीचे सर्टिफिकेट सर त्या ठिकाणी देणार होते.साडे सहा वाजता आम्ही बस मध्ये बसून परतीच्या प्रवासाला निघलो.संगमनेर मध्ये येतांना रात्री चे साडे आठ वाजले होते.हॉटेल मध्ये गेल्यावर सर्वांनी एकत्र जेवण केले. आणि शेवटी सरांनी त्यांच्या लग्नचा वाढ दिवस सह पत्नीक आणि मुलगा अक्षन तसेच मेहुण्या सोबत केक कापून साजरा केला. हा क्षण खूपच विलोभनीय होता.मी स्वतःला भाग्यवान समजतो की या सुंदर अश्या विलोभनीय क्षणा चे साक्षीदार होता आले आणि म्हून त्यामुळे एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे सर यांचे खुप खुप आभार मानतो. हे केवळ आनंद सरांमूळे शक्य झाले. मी त्यांचा फार ऋणी आहे... धन्यवाद.. रमेश बनसोडे संगमनेर

धन्यवाद..

रमेश बनसोडे संगमनेर

User Comments

360 Explorer

Reply 1 year Ago

Thank you

Leave A Comment