10 AUG

कळसुबाई शिखर चढण्याचा एक थरारक अनुभव

SHREYA ACHARYA 15 Comments
माझा पहिला ट्रेक.. मी आणि आर्या ट्रेकला निघालो.एक छोटी बस आम्हाला घ्यायला आली.पहिल्यांदा मम्मीने आम्हाला एकट्या सोडलं होत.आम्ही गाडीत बसलो आणि झोपून पण गेलो कारण थंडी होती.आम्ही सकाळी पोहचलो तेव्हा एका काकांकडे नाश्ता करायला गेलो.त्यानंतर सगळ्यांना एक चॉकलेट दिलं.माझे खूप सारे फ्रेंड्स झाले.आम्ही सगळे 7.30 सकाळी चढायला सुरुवात केली.मी आर्या आणि आद्या तिघी सोबत चालत होतो.आनंद काकांनी सहा जणांना वॉकी टॉकी दिले होते.मी पहिल्यांदा ते पाहिलं.मी जेव्हा चढत होती तेव्हा पाहिलं की एका काकांना नकली पाय लावलेला.एक पाय नसून ही ते काका इतके चढले.आम्ही हळू हळू वर चढलो.माझी तब्येत आधीच बरी नव्हती.पण भारी वाटत होते.मी खूप फोटो काढले.तसेच सगळ्यांनी मिळून पण खूप फोटो काढले. आम्ही संविधान उद्देशिका वाचन केले.मला तर स्वप्नं च वाटत होत.मी स्वतःला चिमटा काढला आणि म्हटले हे तर खरचं आहे.मी इतक्या उंचावर आले आहे. खाली उतरताना मी एकदा पडली सुद्धा..पण काही नाही झालं.खाली उतरली तेव्हा आदय चे पप्पांनी आम्हाला लेमन जुस दिला.आम्ही खाली उतरताना दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला गेलो.मग परत जरासा चालव लागलं.पाय खूप दुखायला लागले आणि मज्जा तर खूपच आली.मी हा कळसूबाई ट्रेक कधीच विसरणार नाही.

Thank YOu..

श्रेया प्रेम आचार्य अलिबाग, अलिबाग

User Comments

360 Explorer

Reply 1 year Ago

Thank you

Leave A Comment